Home अहमदनगर पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणातील फरार आरोपीस उत्तरप्रदेशमधून अटक

पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणातील फरार आरोपीस उत्तरप्रदेशमधून अटक

Journalist Rohidas Datir murder case arrested from Uttar Pradesh

अहमदनगर | Murder Case: राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणातील फरार असलेला चौथा आरोपी अक्षय कुलथे यास पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेतले आहे.

पत्रकार रोहीदार दातीर यांचे मल्हारवाडी येथून अपहरण करून जीवे ठार मारण्यात आले होते. त्यानुसार राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी करून लाला अर्जुन माळी व तोफिक मुक्तार शेख या दोन आरोपींस अटक केली होती.

त्यांनतर या गुन्ह्याचा तपास पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे वय ४६ रा. वांबोरी यास अटक करण्यात आली होती. मात्र चौथा आरोपी हा अक्षय कुलथे फरार झाला होता. संदीप मिटके यांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी अक्षय कुलथे यास उत्तरप्रदेश येथील चटीया  ता. बिनंदनकी जिल्हा फतेपूर उत्तरप्रदेश येथून मोठ्या शिथापीने अटक करून ७२ तासांची रिमांड कस्टडी देण्यात आली आहे.   

Web Title: Journalist Rohidas Datir murder case arrested from Uttar Pradesh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here