मोठी घोषणा: राज्यातील १८ वर्षावरील नागरिकांना १ मे पासून मोफत लस
मुंबई: महाराष्ट्रातील १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना नागरिकांना १ मे पासून मोफत लस देण्याची घोषणा ठाकरे सरकारने केली आहे.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. तिसऱ्या टप्पात केंद्रसरकारने देशभरात १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लसीकरण करण्यात येईल. सरकार हे आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेणार आहे. जागतिक टेंडर मागविण्यात आले असून जास्तीत जास्त लस खरेदी करण्यात येणार आहे. देशातील १७ राज्यांनी मोफत लस देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
Web Title: Maharashtara State Free Vaccination