पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना अटक
श्रीगोंदा | Shrigonda: श्रीगोंद्यात कुकडीच्या पाणी प्रश्नावर कुकडी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मारुती भापकर, माजी जिल्हा परिषद सदस्य दिकर पंधरकर, प्रमोद जगताप, सुरेश भापकर या चौघांना श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या चौघा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारुती भापकर म्हणाले डिंबे माणिकडोह जोड बोगद्याचे काम आणि कुकडीचे आवर्तन २५ एप्रिलला सोडावे या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलन करताना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केलेले नाही शेतकऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी पोलिसांनी अटक केली आहे. आता पुढील आंदोलन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या निवासस्थानी करणार आहोत.
मारुती भापकर यांनी कुकडीच्या पाणी प्रश्नावर केलेल्या आंदोलनास स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी, सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांनी पाठींबा दिला आहे.
Web Title: Demonstration in front of Kukadi office