Home अहमदनगर कोरोनाबरोबरच अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचे संकट

कोरोनाबरोबरच अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचे संकट

unseasonal rains in Ahmednagar

अहमदनगर: सध्या जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु आहे त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने संकटात भर पडली आहे. नगर शहरासह, श्रीगोंदा, राहता,  पारनेर, कोपरगाव या तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाउस झाला.

अचानक आलेल्या पावसाने काही ठिकाणी कांदा भिजला तर आंब्याच्या कैऱ्यांच्या सडा पडला आहे. एकाच महिन्यात दोनदा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

गेल्या दोन तीन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. सकाळी व सायंकाळी ढगाळ वातावरण राहत होते. हवामान विभागानेही ११ व ११ एप्रिलला अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला. सध्या जिल्ह्यात कांदा काढणी सुरु आहे. या अचानक पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धांदळ उडाली आहे. काहींचा कांदाही भिजला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.  

Web Title: Crisis of unseasonal rains in Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here