रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे अखेर अटकेत
अहमदनगर: रेखा जरे यांची नगर पुणे महामार्गावरील जातेगाव फाटा येथे ३० नोव्हेंबर रोजी दोन मारेकऱ्यांनी गळा चिरून हत्या केली होती.
या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे(Bal Bothe) याला अखेर नगर पोलिसांनी शनिवारी पहाटे हैद्राबाद येथून अटक केली आहे, ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. बाळ बोठे हा गेल्या तीन महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत पसार होता.
रेखा जरे यांची हत्या केल्यानंतर दोन दिवसांतच मारेकार्यांसह पाच आरोपींना अटक केली. या हत्येची सुपारी देणारी मुख्य सूत्रधार बाळ बोठे हा फरार होता. पोलीस पथके त्याचा शोध घेत होते. अखेर हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. बाळ बोठे याने सुपारी देऊन हत्या का केली असावी याचे मुख्य कारण आता समोर येणार आहे.
Web Title: Rekha Jare murder mastermind Bal Bothe finally arrested