राजूर: अनुदान नको, जेवण द्या, आदिवासी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
राजूर: अनुदान नको, जेवण द्या, आदिवासी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
राजूर: राज्य सरकारच्या आदिवासी विभागाने विद्यार्थ्यांच्या खात्यावर जेवणासाठी सुरु केलेली थेट अनुदान देण्याची योजना डीबीटी बंद करावी या मागणीसाठी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात आदिवासी वसतीगृहातील २०० विद्यार्थ्यांनी आज ठिय्या आंदोलन केले.
You May Also Like:Shahid Kapoor wife age | Mira Rajput
प्रकल्प अधिकारी डॉ. संतोष ठुबे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. आदिवासी समाजाचे जेष्ठ नेते अशोकराव भांगरे म्हणाले, “आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त आहेत. मुख्यमंत्री यांना भेटून या मागण्यांसाठी त्यांच्याकडे आग्रही राहू मात्र विद्यार्थ्यांना डीबीटी” नुसार खात्यावर प्रत्येकी तीन ते साडे तीन हजार रुपये भोजनासाठी मिळतात. ठेकेदार १४०० रुपयांत भोजन देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले जेवण मिळत नाही. डीबीटी रद्द केल्यानंतर ठेकेदारास तीन हजार रुपये मिळण्यासाठी आग्रही राहा. ठेकेदाराला योग्य मोबदला मिळाल्यास तो विद्यार्थ्यांना चांगले जेवण देईल. स्वयं अर्थसहायता जुनिअर कॉलेजमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व इतर सुविधा मिळत नाही.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.