संगमनेर : विवाहितेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या
संगमनेर : विवाहितेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या
संगमनेर: गुरुवार दि.२ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास छळास कंटाळून विवाहित युवतीने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बँकेचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी होणाऱ्या छळास कंटाळून विवाहित युवतीने आत्महत्या केली आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील जाखुरी शिवारात घडली. रोहिणी अमोल वाकचौरे (वय-२४) असे ह्या विवाहितेचे नाव आहे.
You May Also Like:Shahid Kapoor wife age | Mira Rajput
याबाबत संगमनेर तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रोहिणी वाकचौरे ही विवाहित युवती वडगावलांडगा येथे सासरी नांदत असताना बँकेचे कर्ज फेडण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी पती अमोल अण्णासाहेब वाकचौरे, सासू अंजली अण्णासाहेब वाकचौरे व मामे सासरे नानासाहेब गवराम लांडगे (तिघे रा.वडगावलांडगा) हे तिघे जण तिचा शारीरिक व मानसिक छळ करत होते.
त्यामुळे ती छळास कंटाळून काही महिन्यापासून माहेरी राहत होती. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास तिने जाखुरी शिवारात असणाऱ्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी दत्तात्रय आबू पानसरे (रा. जाखुरी ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी पती, सासू व मामे सासरे या तिघांविरुद्ध गु.रजि.नं. १२०/२०१८ भादंवि कलम ३०६, ४९८ (अ), ३२३, ५०४,५०६ (३४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.