संगमनेर तालुक्यात शोरूम फोडून सव्वा लाखाची चोरी
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावरील वेल्हाळे शिवारातील शान कार्स शोरूममध्ये अज्ञात चोरट्यांनी काचेच्या दरवाजाचे लॉक तोडून प्रवेश करत १ लाख २० हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना शुक्रवारी तीन वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी नाशिक पुणे महामार्गावरील वेल्हाळे शिवारातील शान कार्स शोरूममधील कर्मचारी काम आटोपून घरी गेले असता पहाटे तीन वाजेच्या सुमारास याठिकाणी येऊन काचेच्या दरवाजाचे लॉक तोडून आतमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी कॅशियरच्या कप्प्यातील १ लाख २० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. हा सर्व प्रकार शोरूमच्या सीसीटीव्हीच्या कॅमेरात चित्रित झाला आहे. शोरूमचे मुख्य प्रबंधक मकरंद शंकर जोशी यांनी घटनेची शहर पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पंचानामा करत तपासाच्या सूचना दिल्या. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Web Title: Burglary of the showroom in Sangamner taluka