औरंगाबाद खंडपीठाने बाळ बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
अहमदनगर: यशस्विनी महिला ब्रिग्रेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी पत्रकार बाळ बोठे(Bal Bothe) याचा अटकपूर्व जमीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला आहे.
सोमवारी खंडपीठात बोठे याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. सरकारी व आरोपी पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने तत्काळ निर्णय दिला. यामध्ये बोठे याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. ३० नोव्हेंबर रोजी जातेगाव घाटात रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केलेली आहे. मुख्य सूत्रधार सुपारी देणारा बोठे मात्र गेल्या दोन महिन्यापासून पसार आहे. बोठेचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला होता. नंतर त्याने औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होता. बोठे हा फरार असून राज्यातील सर्वच पोलीस त्याच्या मागावर आहेत. त्याला शोधण्यासाठी स्टॅडिंग वारंट जारी करण्यात आले आहे. बाळ बोठे हा पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत आहे गेल्या दोन महिन्यापासून तो फरार आहे.
Web Title: Rejects Bal Bothe pre-arrest bail application