Home अहमदनगर कार व जेसीबी यांच्या धडकेत अहमदनगर जिल्हा परिषद सीइओ जखमी

कार व जेसीबी यांच्या धडकेत अहमदनगर जिल्हा परिषद सीइओ जखमी

Ahmednagar Zilla Parishad CEO injured in car-JCB Accident 

बोटा: नगर कल्याण महामार्गावर नांदूर फाटा येथे कार व जेसीबी यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात कार मध्ये असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर हे जखमी झाले आहे. उपजिल्हाधिकारी संदीप निचित हे किरकोळ जखमी झाले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली.

नगरकडून संगमनेर येथे नगर कल्याण महामार्गाने अहमदनगरचे सीईओ डॉ. राजेंद्र क्षीरसागर व उप जिल्हाधिकारी संदीप निचित हे इनोह्वा कारने जात होते. त्यांची कार नांदूर फाटा येथे आली असता नांदुरने जोडणाऱ्या रस्त्याने जेसीबी अचानक महामार्गावर आल्याने कारची जेसीबीला धडक बसली.

या अपघातात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांच्या डोक्याला मार लागला असून  उप जिल्हाधिकारी संदीप निचित हे किरकोळ जखमी झाले आहे.  या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे घटनास्थळी जाऊन दोघांना आळेफाटा येथील माउली हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताचा पंचनामा करण्याचे काम सुरु होते असे आळे फाटा पोलिसांनी सांगितले.

Web Title: Ahmednagar Zilla Parishad CEO injured in car-JCB Accident 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here