अकोले तालुक्यात ११ ग्रामपंचायती बिनविरोध, 41 ग्रामपंचायतीची रणधुमाळी
अकोले | Akole: अकोले तालुक्यात ५२ ग्रामपंचायत निवडणुकीत ११ ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आल्या आहेत तर ४१ ग्रामपंचायतीची रणधुमाळी निवडणूक होणार आहे. बोटावर मोजण्या इतक्याच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यात मतदारांचा कल हा निवडणुकीत लढत देण्याचा आहे.
अकोले तालुक्यातील चितळवेढे, निळवंडे, कळंब, बहिरवाडी, वाघापूर, उंचखडक खुर्द, निंबळ जाचकवाडी, म्हाळादेवी, मोग्रस, मनोहरपूर या ११ ग्रामपंचायती निवडून आल्या आहेत. अनेक ठिकाणी गाव पुढार्यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न केले मात्र काही कार्यकर्त्यांमुळे बिनविरोध वारे धुळीस मिळाले आहे.
तर ४१ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक होणार असून निवडणुकीत रंगत पहायला मिळणार आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला आहे.
४ जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. प्रशासनाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. तालुक्यातील ४६६ जागांसाठी उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या कामासाठी १५०० कर्मचारी काम करत असून पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात येणार आहे.
Web Title: Akole taluka 11 grampanchayats are unopposed