महिला पोलीसाचाच गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न
अहमदनगर | Parner: फिर्याद दाखल करीत असताना वेळ लागल्याच्या कारणावरून महिला पोलीस कर्मचारी यांचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
याप्रकरणी महिला पोलीस कर्मचारी भीमाबाई रेपाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सोमवारी सुपे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुपे पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी भीमाबाई रेपाळे रविवारी रात्रीच्या ड्युटीवर होत्या. या रात्री ११:३० वाजेच्या सुमारास सुपे येथील बन्सी रामचंद्र कांबळे, रा. इंदिरानगर सुपा ता. पारनेर हे त्यांची मुलगी शिवाजी बन्सी कांबळे, तेजश्री बन्सी कांबळे, मंदा संपंत गांगुर्डे, अशोक पिराजी जाधव रा. सुपा ता. पारनेर यांच्याबरोबर सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आले असता फिर्याद घेण्याचे काम चालू असताना अचानक सर्व्हर बंद झाले. त्यामुळे फिर्याद दाखल होण्यास वेळ जात होता. त्यावेळी या पाचही आरोपींनी तुम्ही आमची फिर्याद दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहात असे म्हणून वाईट बोलण्यास सुरुवात केली. यावेळी शिवानी कांबळे, तेजश्री कांबळे, मंदा गांगुर्डे यांना पोलीस कर्मचारी भीमाबाई यांना समजावून सांगत असताना शिवीगाळ केली. तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून नोकरी घालविते अशी धमकी दिली.
यावेळी रेपाळे यांच्या अंगास झटून शिवानी कांबळे हिने जीवे मारण्याच्या हेतूने गळा दाबण्यात आला तसेच तेजश्री व मंदा या दोघींनी मारहाण करत जखमी केले.
Web Title: Parner Attempted murder by strangling female police officer