Home अहिल्यानगर दरोडेखोरांनी गळ्याला चाकू लावून दोन ट्रक चालकांना लुटले

दरोडेखोरांनी गळ्याला चाकू लावून दोन ट्रक चालकांना लुटले

Ahmednagar robbers stabbed two truck drivers in the neck

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात दरोडीखोरी लुटमार या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातारण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित होत आहे.

नुकतीच घडलेली घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत दोन ट्रक चालकांना लुटण्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात ज्ञानोबा लक्ष्मण मुंढे वय ३५ ता. परळी, जि. बीड याने फिर्याद दाखल केली आहे.

याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की,  ज्ञानोबा लक्ष्मण मुंढे व त्याचा मित्र माधव अच्चुत होंबळे हे दोघे जण मित्र नगर औरंगाबाद रोड येथे सनी पलेस समोर त्यांच्याकडील असलेल्या आपापल्या ट्रकमध्ये काचा बंद करून झोपले होते.

रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास चार दरोडेखोर येऊन त्यांनी दोन्ही ट्रकच्या काचा फोडल्या. आणि या दोघांच्या गळ्याला चाकू लावून १८ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम काढून घेतली. यानंतर दरोडेखोर तेथून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण सुरसे हे करीत आहेत.

Web Title: Ahmednagar robbers stabbed two truck drivers in the neck

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here