पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने केली बेदम मारहाण व धमकी, गुन्हा दाखल
राहुरी | Rahuri: पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला लोखंडी नळीने बेदम मारहाण करीत तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. ही घटना २० डिसेंबर रोजी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे घडली.
याप्रकरणी पत्नीने पोलीस ठाण्यात पती सोमनाथ कदम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कदम हे कुटुंबीय राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे राहते. आरोपी सोमनाथ कदम याने २० डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्याची पत्नी हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या डोक्यात लोखंडी नळीने मारून जखमी केले तसेच पाठीवर कंबरेवर, पोटावर मारून जखमी करण्यात आले. शिवीगाळ करण्यात आली. तुला व मुलांना मारून टाकीन व मी देखील आत्महत्या करील अशी धमकी दिली.
यावरून या महिलेने राहुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. यावरून तिचा पती सोमनाथ दादा कदम याच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक डी. आर. चव्हाण हे करीत आहे.
Web Title: Rahuri wife’s character the husband beat her to death