रोखपाल तरुणीच्या गळ्याला चाकू लावून अत्याचार, तिचे फोटो काढून चौदा लाख लुटले
पाथर्डी: पाथर्डी शहरातील एका मल्टीस्टेटच्या रोखपाल असलेल्या तरुणीच्या गळ्यावर चाकू लावत तिच्यावर अत्याचार करण्यात आला.
तिचे त्या अवस्थेतील फोटो व व्हिडीओ कडून प्रसारित करण्याची धमकी देत संस्थेच्या तिजोरीतील पाच लाख तीन हजार रुपये तसेच तारण ठेवलेले ११ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पिडीत युवतीकडून खंडणी म्हणून घेतल्याचे घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी सागर संजय देशपांडे रा. वामनभाऊनगर पाथर्डी (मुळचा रहिवासी पैठण औरंगाबाद) याच्या विरोधात पिडीत मुलीने फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सागर देशपांडे हा पाथर्डी नगर रस्त्यावरील एका मल्टीस्टेट मध्ये व्यवस्थापक या पदावर काम करत होता. संस्थेने त्याल काही दिवसांपूर्वी कामावरून काढून टाकले होते. याच संस्थेत काम करणाऱ्या युवतीशी त्याची ओळख होती. त्याने या तरुणीला १६ ऑगस्ट २०२० रोजी वामनभाऊ नगर येथे राहत्या घरी बोलाविले. तिथे सागरने त्या युवतीच्या गळ्याला चाकू लावून तिच्यावर अत्याचार केला. त्या अवस्थेतील त्याने फोटो काढले.
त्यानंतर त्याने तिला फोटो प्रसारित करण्याची धमकी देत तिच्याकडून संस्थेच्या तिजोरीतील ५ लाख ३ हजार ४०० रुपये रोख स्वरुपात घेऊन गेला. तसेच ग्राहकांनी ठेवलेले ११ लाख ६५ हजार रुपयांचे दागिने त्याने बळजबरीने नेले. सागरने त्या युवतीला १३ डिसेंबर रोजी फोन करून एका हॉटेलवर बोलाविले. तेथे त्याने मोबाईल मधील फोटो दाखविले. तू माझ्याकडे पैसे व दागिने मागितले तर हे फोटो प्रसारित करीन अशी धमकी देऊन हाकलण्यात आले. याप्रकरणी या युवतीने दिलेल्या तक्रारीवरून सागर देशपांडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Pathardi cashier stabbed the young woman in the neck