अकोले | Akole: अकोले तालुक्यामध्ये आज ६ व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. यामध्ये समशेरपूर येथील ५ तर पिंपळगाव निपाणी येथील एक जण बाधित आढळून आला आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधित संख्या ३०९५ इतकी झाली आहे.
आज तालुक्यात एकूण ६४ अँटीजेन चाचण्या घेण्यात आल्या यामध्ये सहा जण बाधित आढळून आले आहेत. आज प्राप्त झालेल्या अहवालात समशेरपूर येथील ३६ वर्षीय महिला, ४३ वर्षीय महिला, ३४ वर्षीय महिला, ५ वर्षीय मुलगा, ३६ वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत. पिंपळगाव निपाणी येथे ४३ वर्षीय पुरुष बाधित आढळून आला आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या ३०९५ वर पोहोचली आहे. आज पप्राप्त झालेले सर्व अहवाल हे अँटीजेन चाचणीचे आहेत. शहरातील रुग्णसंख्या कमी झालेली दिसून येत आहे. काही शासकीय अहवाल अजून प्रतीक्षेत आहेत.
Web Title: Akole Taluka Six infected by rapid Antigen Test