पोलीस ठाण्याच्या कोठडीत असेलल्या ९ आरोपींना अन्नातून विषबाधा, उल्ट्या सुरु झाल्याने
Accused in the custody of police station food poisoning
नालासोपारा: शहरातील पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत असेलल्या ९ आरोपींना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या सर्व आरोपींना पालिकेच्या रुग्णालात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
नालासोपारा पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत ९ आरोपी होते. त्यापैकी ५ आरोपी नालासोपारा पोलीस ठाण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकांच्या हत्येतील तर ४ आरोपी पेल्हार पोलीस ठाण्यातील एटीएम फसवणूक गुन्ह्यातील आहेत. मंगळवारी दुपारी या आरोपींना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले होते. त्यांनतर काही वेळात दोन आरोपींना उल्ट्या सुरू झाल्या. पाठोपाठ इतर आरोपींनाही तोच त्रास सुरू झाला. त्यामुळे या सर्व आरोपींना नालासोपारा येथील पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या सर्व आरोपींची प्रकृती स्थिर असून अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवले. तसेच याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी माहिती दिली आहे.
Web Title: 9 accused in the custody of police station food poisoning
Also See: Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App