संगमनेर: ‘दूधगंगा’ पतसंस्थेमध्ये तब्बल 80 कोटीचा अपहार, २१ जणांवर गुन्हा, ४ जण अटकेत
Sangamner Crime: दूधगंगा पतसंस्थेमध्ये तब्बल 80 कोटी 79 लाख 41 हजार 981 रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे निष्पन्न झाले असून २१ जणांवर गुन्हा दाखल झाला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.
संगमनेर : शहरातील नावाजलेल्या दूधगंगा पतसंस्थेमध्ये तब्बल 80 कोटी 79 लाख 41 हजार 981 रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्यासह एकूण 21 जणांविरुद्ध काल गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे. प्रलंबित निर्णयानंतर दूधगंगा पतसंस्थेतील अपहार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने ठेवीदार व सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे.
अपहार प्रकरण:
गेल्या दीड वर्षांपासून दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक अपहाराचे प्रकरण गाजत होते. या पतसंस्थेचे 2016 ते 2021 या पाच वर्षांचे फेर लेखा परीक्षण करण्यात आले या लेखापरीक्षणांमध्ये आर्थिक आभार झाल्याचे उघड झाले. यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी विशेष लेखा परीक्षकांना गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली. गुन्हा दाखल होण्यास विलंब होत असल्याने ठेवीदारांनी संताप व्यक्त केला होता. जिल्हा विशेष लेखापरीक्षक राजेंद्र निकम यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अखेर काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दूधगंगा पतसंस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक यांच्यासह नातेवाईकांनी 80 कोटी 79 लाख 41 हजार 981 रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांची नावे:
निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून काँग्रेसचे माजी जिल्हापरिषद सदस्य व संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब दामोदर कुटे (रा. गणपती मळा सुकेवाडी), भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ (रा.संगमनेर), भाऊसाहेब संतु गायकवाड (मयत) (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), चेतन नागराज बाबा कपाटे (रा. पैठणरोड, संभाजीनगर, औरंगाबाद), दादासाहेब भाऊसाहेब कुटे (रा. गणपतीमळा, ता. संगमनेर), अमोल भाऊसाहेब कुटे (रा. गणपतीमळा, ता. संगमनेर), विमल भाऊसाहेब कुटे (रा. गणपतीमळा, ता. संगमनेर), शकुंतला भाऊसाहेब कुटे (रा. गणपतीमळा, ता. संगमनेर), सोनाली दादासाहेब कुटे (रा. गणपतीमळा, ता. संगमनेर), कृष्णराव श्रीपतराव कदम (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), प्रमिला कृष्णराव कदम (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), अजित कृष्णराव कदम (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), संदिप दगडु जरे (रा. भूतकरवाडी सावेडी, ता. नगर), लहानु गणपत कुटे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर), उत्तम शंकर लांडगे (रा. वडगाव लांडगा, ता. संगमनेर), उल्हास रावसाहेब थोरात रा. सुकेवाडी, ता. संगमनेर), सोमनाथ कारभारी सातपुते (रा. पावबाकी, ता. संगमनेर), अरुण के. बुरड (रा. नयनतारा सिडको कॉलनी, नाशिक), अमोल क्षीरसागर (रा. गंगापूर रोड, नाशिक) यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार आरोपींना अटक तर इतर आरोपी फरार:
या अपहार प्रकरणी जिल्हा विशेष लेखापरीक्षक राजेंद्र फकिरा निकम यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शहर पोलिसांनी वरील 21 व्यक्तींविरुद्ध 740/2023 भारतीय दंड संहिता 420, 408, 409, 465, 467, 471, 477 अ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात लहानु गणपत कुटे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते, अमोल क्षीरसागर यांना पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपी फरार झाले आहे.
Web Title: 80 crore embezzlement in Dudhganga credit institution, 21 people Crimed
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App