संगमनेरात 8 लाख 8३ हजारांचा ऐवज जप्त, राज्य उत्पादन शुल्कची कारवाई
Breaking News | Sangamner: विविध कारवाई मध्ये एकूण ३७ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये ३७ आरोपींना अटक करण्यात आली.
संगमनेर : विधानसभा निवडणूक आदर्श आचार संहितेच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्कचे संगमनेर पथकाने संगमनेरसह अकोले तालुक्यात धडक कारवाई करीत ८ लाख ८३ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे पोलीस निरीक्षक सुनील सहस्रबुद्धे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने (दि. १५) ऑक्टोबर ते (दि. ९) नोव्हेंबर या कालावधीमध्ये विविध ठिकाणी कारवाई केल्या. काल शनिवारी (दि. ९) दुपारी अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड परिसरात एम.एच. १२ डी.जे. ५०५३ क्रमांकाच्या दुचाकीवर अवैधरीत्या वाहतूक होणार असल्याची खात्रिलायक माहिती उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना समजली होती. त्यानंतर उत्पादन शुल्काच्या पथकाने सापळा लाऊन सदर वाहन पकडले. या वाहनामध्ये देशी मद्याचे २ बॉक्स मिळुन आले.
या प्रकरणी दत्तात्रय निवृत्ती खरात (वय ४०, रा. कोतूळ, ता. अकोले) याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यापूर्वी विविध कारवाई मध्ये एकूण ३७ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये ३७ आरोपींना अटक करण्यात आली. तर ३ वाहने, ६७२ लिटर देशी- विदेशी, ताडी दारू, असा एकूण ८ लाख ९३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Web Title: 8 lakh 83 thousand cash seized in Sangamner
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study