Home अहमदनगर अबब! मोबाईलवर लिंक दाबताच ६७ हजार रुपये गायब

अबब! मोबाईलवर लिंक दाबताच ६७ हजार रुपये गायब

Breaking News | Ahmednagar:  मुलाला खेळण्यास मोबाईल दिल्याने तब्बल ६७ हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

67 thousand rupees disappeared as soon as the link was clicked on the mobile

श्रीरामपूर : लहान मुलांच्या हाती मोबाईल देत असाल तर सावधान ! कारण तुम्हालाही बसू शकतो आर्थिक फटका. कारण असाच काहीसा अधीत प्रकार तालुक्यातील खैरी निमगाव येथे घडला. मुलाला खेळण्यास मोबाईल दिल्याने अण्णासाहेब रोहोम यांना तब्बल ६७ हजार रुपयांचा फटका बसला.

रोहोम यांनी मुलाच्या हाती मोबाईल दिला होता. मोबाईलमध्ये व्हिडीओ पहताना अचानक मोबाईलवर व्हिडीओ कॉल आला. तो मुलांनी पाहिला. यानंतर एक लिंक आली. मुलांनी बटन दाबल्याने लिंक डाऊनलोड झाली. व्हिडीओ बंद झाल्याने मुलांनी वडिलांकडे मोबाईल दिला.

यानंतर त्यांच्या मोबाईलवर ओटीपीचे मेसेजसह क्रेडीट कार्डवरुन खरेदी केल्याचे मेसेज आले. ३०, ८९९ रुपये काढल्याचा पहिला, १८, ४९९ रुपये काढल्याचा दुसरा तर १० हजार रुपये काढल्याचा तिसरा मेसेज आला. यानंतर मोबाईल हॅक झाल्याचे रोहम यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ नगरच्या सायबर सेलशी

संपर्क साखला असता, याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसांत तक्रार देण्याचे सांगण्यात आले.

रोहोम यांनी पोलिसात तक्रार दिली. दोन क्रेडीट कार्डवरून ६६, ७४७ रुपये अज्ञात व्यक्तीने मोबाईल हॅक करून काढल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लिंक दाबताच मोबाईल हॅक करून एवढी मोठी रक्कम सहजा- सहजी हडप होत असेल, बँकांसह सरकार यावर काही तोडगा काढू शकत नसेल तर नुकसानग्रस्त व्यक्तीला मोठा मनःस्ताप सहन केल्याशिवाय पर्याय राहत नसल्याचे वास्तव या प्रकरणावरुन पुन्हा एकदा उघड झाले आहे. दरम्यान, या प्रकरामुळे मोबाईल वापरकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: 67 thousand rupees disappeared as soon as the link was clicked on the mobile

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here