Home अकोले अकोले तालुक्यातील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास ५१७७.३८ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता

अकोले तालुक्यातील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास ५१७७.३८ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता

Akole News: उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे.

5177.38 crore revised approval for Urdhwa Pravara project work in Akole taluka Eknath Shinde

अकोले: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी ५१७७.३८ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला यामुळे ६८ हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)होते. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व काही मंत्री उपस्थित होते.

प्रवरा नदीवर निळवंडे गावाच्या वरील बाजूस हे दगडी धरण बांधण्यात येत असून धरणातून डावा कालवा सुरु होऊन तो ८५ कि.मी. लांब आहे. नदीच्या उजव्या तीराने जाणारा कालवा ९७ कि.मी. आहे. या दोन्ही कालव्यातून ६८ हजार हेक्टर सिंचन होणे अपेक्षित आहे. २०२७ पर्यंत या प्रकल्पाचे कालव्यासह संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होताच अकोले, संगमनेर, राहुरी, राहाता, कोपरगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अवर्षणप्रर्वण भागातील १८२ गावांना सिंचनाचा लाभ होईल.

Web Title: 5177.38 crore revised approval for Urdhwa Pravara project work in Akole taluka Eknath Shinde

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here