बचत गटाच्या महिलांचे ५० हजार बँकेतूनच लंपास
Ahmednagar News: ५० हजार रूपयांची रक्कम बँकेतच अज्ञात चोरट्यांनी लंपास (theft).
श्रीरामपूरः महाराष्ट्र बँकेने बचत गटाला दीड लाखाचे कर्ज मंजूर केल्यानंतर महिलांनी ही रक्कम कापडी पिशवीत ठेवली. त्यातील ५० हजार रूपयांची रक्कम बँकेतच अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.
श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. २ मधील अहिल्यादेवीनगर येथे आरती नितीन शिंदे, यास्मीन जब्बार शहा, शोभा संजय जाधव, मिना सुरेश दुग्गड या महिला मंगळवारी (दि.२६) छत्रपती शिवाजी महाराज रोडवर असलेल्या महाराष्ट्र बँकेमध्ये बचत गटाच्या मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम काढण्यासाठी गेल्या होत्या. रक्कम काढल्यानंतर एका कापडी पिशवीमध्ये ठेवली. त्यानंतर त्या बचत गटातील महिलांना पैसे वाटण्यासाठी घरी गेल्या. त्यावेळी पिशवीमध्ये त्यांना १ लाख रूपयांचीच रक्कम दिसली. पिशवीच्या खालच्या भागाला कापलेले दिसले. बँकेमध्येच ५० हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरटयाने कशानेतरी पिशवी कापून अलगद काढून चोरून नेली समोर आले. आरती शिंदे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: 50,000 for the women of the self-help group from the bank itself
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App