जिल्ह्यातील या ग्रामपंचायतीला ५० लाखांचा पुरस्कार जाहीर
लोणी | Loni Budruk: राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक या ग्रामपंचायतीने राज्यशासनाच्या माझी वसुंधरा अभियानात सहभागी होऊन ५० लाखांचा पुरस्कार मिळविला आहे. या पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
जेष्ठ नेते माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे हे गाव आहे. या ग्रामपंचायतीने आतापर्यंत देश व राज्य पातळीवर बहुतांशी बक्षिसे मिळविली आहेत. दोन कोटीपेक्षा अधिक रकमेची बक्षिसे ग्रामपंचायतने मिळविली आहे. लोणी ग्रामपंचायत विकासासाठी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे. पर्यावरण व स्वच्छता अभियानात देखील अनेक बक्षिसे या ग्रामपंचायतने मिळविली आहे. राज्य स्तरावरील माझी वसुंधरा अभियानातील ५० लाखांचा पुरस्कार जाहीर होताच ग्रामस्थांनी आनंद साजरा केला.
Web Title: 50 lakh award announced for loni Budruk Gram Panchayat