LPG Hike: घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ

नवी दिल्ली | LPG Hike: महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेला आणखी एक जोराचा झटका दिला आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अगोदरच जनता भयभीत झाली आहे. आणि त्यातच आता सिलिंडरच्या दरात (gas Price) ही वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींच्या बजेट चांगलेच कोलमडले आहे.
कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता 14.2 किलोंच्या घरगुती सिलिंडरची किंमत 999.50 रुपये झाली आहे. याआधी मार्च 2022 मध्ये घरगुती सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
त्याचबरोबर या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 102 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 2355.50 रुपये झाली आहे.
Web Title: 50 increase in price of domestic gas cylinder
















































