Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात या तालुक्यात ५० कोंबड्या मृतावस्थेत, प्रशासन सतर्क

अहमदनगर जिल्ह्यात या तालुक्यात ५० कोंबड्या मृतावस्थेत, प्रशासन सतर्क

50 hens die in this taluka in Ahmednagar 

Ahmednagar| पाथर्डी: पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे  दोन दिवसांत ५० कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्या आहेत. तसेच श्रीगोंदा शहरात एक कावळा व एक कबुतर मृत अवस्थेत आढळून आले आहे.

त्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी बर्ड प्लू च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी बैठक घेत सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत. तक्रार प्रतिसादासाठी ७८ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मिडसांगवी येथे शफिक शेख यांच्याकडे घरगुती कुकुटपालनात ९० पक्षी होते. त्यामधील काही पक्षी व गावातील इतर पक्षी असे ५० मृत्यू झाल्याचे आढळून आले आहेत. त्याच बरोबर श्रीगोंदा येथे एक कावळा व एक कबुतरही मृत आढळून आले आहेत.

बर्ड प्लुच्या उपाययोजनांसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी तातडीनेबैठक घेतली. जिल्ह्यात अद्याप बर्ड प्लू आजार आढळून आलेला नाही. राज्यात इतर जिल्ह्यात लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातही ७८ तपासणी पथके कार्यरत करण्यात आली आहे.  

Web Title: 50 hens die in this taluka in Ahmednagar 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here