रतनगडावर गेलेल्या ५ तरुण, तरुणींना रात्र झाली वाट सुचेना अन…
Breaking News | Akole: तरुण तरुणींनी वाट सुचेना मात्र पावसामुळे गडावर अडकलेल्या तीन तरुण आणि दोन तरुणींची वन्यजीव विभागाने शनिवारी सुखरूप सुटका.
राजूर: अकोले तालुक्यातील रतनगडावर पर्यटनासाठी आलेल्या तरुण तरुणींनी वाट सुचेना मात्र पावसामुळे गडावर अडकलेल्या तीन तरुण आणि दोन तरुणींची वन्यजीव विभागाने शनिवारी सुखरूप सुटका केली. हे पाचही पर्यटक पुणे येथील असल्याचे समजते. आपण घरी सांगून न आल्यामुळे त्यांनी आपली नावे आणि पत्ता सांगण्यास टाळाटाळ केली.
याबाबत वन परिक्षेत्राधिकारी अमोल आडे यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की, हे पाच तरुण-तरुणी शनिवारी (दि. ३) दुपारी दीडच्या सुमारास साम्रदच्या बाजूने रतनगडावर आले. त्यांना गडावरील चढाई करण्यास वेळ लागला. सध्या भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच रतनगडावर पावसाचे प्रमाण अधिक आहे. सुटका झाल्यावर या तरुण- तरुणींनी नाव व पत्ता सांगण्यास टाळाटाळ केली. वनरक्षक संदीप पिचड, वनपाल रघुनाथ कुवर, शंकर लांडे यांनीही या कामी मदत केली.
हे तरुण-तरुणी गडावर फिरत असताना रात्र झाली. त्यात त्यांना वाटही सुचेना. त्यामुळे भीतीपोटी त्यांनी साम्रद येथील ज्या हॉटेल चालकाकडे नाश्ता केला होता, त्याच्या मोबाईलवर फोन करून माहिती दिली. मिळालेल्या माहितीवरून त्या हॉटेल चालकाने रतनवाडीचे माजी सरपंच संपत झडे यांना कळवले.
तात्काळ वन्यजीव विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार वन परिक्षेत्राधिकारी अमोल आडे यांनी आपल्या रेस्क्यू टीमला तात्काळ गडावर जाण्यास सांगितले. हनुमंत झडे, बाळू झडे, शिवाजी झडे, पुंडलिक तातळे यांच्या पथकाने गडावर जाऊन रात्री नऊच्या सुमारास या तरूणांना सुखरूप गडाखाली आणले.
Web Title: 5 young men and women who went to Ratangad did not know how to wait for the night
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study