वाढदिवसाच्या दिवशी आईने नवीन मोबाईल दिला नाही; घेतला ‘हा’ भयानक निर्णय
Breaking News | Sangli Suicide: वाढदिवसाच्या दिवशी मोबाइल न दिल्याने 15 वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना.
सांगली: सांगली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दिवशी मोबाइल न दिल्याने 15 वर्षांच्या मुलाने आपले जीवन संपवले आहे. सदर मुलगा इयत्ता नववीत शिकत होता. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे ही घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दिवशी आईने नवीन मोबाइल न घेऊन दिल्याने अवघ्या 15 वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर मुलाचा एक दोन दिवसांपूर्वी वाढदिवस होता. या दिवशी त्याने आपल्या आईकडे नवीन मोबाइल फोनची मागणी केली होती. मात्र आईने काही अडचणींमुळे मोबाइल घेऊन देण्यास नकार दिला. मात्र आईने आपला हट्ट पूर्ण न केल्याने 15 वर्षांच्या मुलाने टोकाचा निर्णय घेत आपले जीवन संपवले आहे. सदर मुलाने जीवन संपवल्याने त्याच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.
सांगलीत अशी धक्कादायक घटना समोर आल्यानंतर अठरा वर्षांच्या खालील मुलांच्या मोबाइल आणि इंटरनेट वापरावर राज्य शासनाने बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत आहे. सोशल मिडिया आणि रील्सच्या अतिआहारी गेल्याने आशा घटना घडत आहेत का याचा विचार केला जाणे आवश्यक आहे. मात्र 15 वर्षांच्या मुलाने केवळ मोबाइल न मिळाल्याने आपले जीवन संपवले आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Web Title: 5-year-old boy commits suicide after not being given a mobile phone
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News