संगमनेर: पाच लाखांची फसवणूक, आरोपीला एक वर्षांची कैद, पाच लाखांचा दंड
Sangamner News: भूखंडाचा व्यवहार न झाल्याने आरोपीने तक्रारदाराला त्या व्यवहारापोटी दिलेला धनादेश वटला नाही. (Fraud)
संगमनेर: भूखंड व्यवहारापोटी अनामत म्हणून आरोपीला तक्रारदाराने पाच लाख रुपये दिले होते. मात्र नंतर सदर भूखंडाचा व्यवहार न झाल्याने आरोपीने तक्रारदाराला त्या व्यवहारापोटी दिलेला धनादेश वटला नाही. त्यामुळे संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकान्यांनी यातील आरोपीला दोषी ठरवत एक वर्ष कारावासाची शिक्षा आणि पाच लाख रुपयांच्या दंड ठोठावला.
प्रकाश प्रभू अरगडे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. प्रशांत चंद्रकांत डहाळे यांनी यासंदर्भात संगमनेरच्या न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी. एम. गिरी यांच्यासमोर झाली. प्रशांत डहाळे यांना प्लॉट खरेदी करायचा होता. त्यासाठी अरगडे याने त्याच्या घरासमोर असलेल्या प्लॉट दाखला. तसेच वा संदर्भातील व्यवहार करून देण्याचे अरगडे याने कबूल केले होते. डिसेंबर २०२० मध्ये डहाळे यांना प्लॉटच्या व्यवहारापोटी अॅडव्हान्स म्हणून पाच लाखांचा विश्वासाने चेक दिला. मात्र व्यवहार पुर्ण न झाल्याने अरगडे व्यवहार यांनी हे पैसे परत केले नाही. त्यामुळे हा खटला भरला होता.
Web Title: 5 lakh fraud, one year imprisonment for the accused, 5 lakh fine
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App