Home अहमदनगर नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी एकूण 49.28 टक्के मतदान, तर नगर जिल्ह्यात….

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी एकूण 49.28 टक्के मतदान, तर नगर जिल्ह्यात….

Nashik Graduate Constituency Election: जवळपास ५० टक्के लोकांनी मतदानाकडे पाठ फिरविली.

49.28 percent total voter turnout for Nashik graduate Constituency election

अहमदनगर: नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी सोमवार (दि.30) मतदान प्रक्रिया होवून विभागातील पाच जिल्ह्यात 49.28 टक्के मतदान झाले. विभागात 338 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. विभागातील 2 लाख 62 हजार 678 मतदानापैकी 1 लाख 29 हजार 456 इतके मतदान झाले असून 49.28 टक्के आहे. जवळपास ५० टक्के लोकांनी मतदानाकडे पाठ फिरविली आहे.

तर नगर जिल्ह्यात 1 लाख 15 हजार 638 मतदारांपैकी 58 हजार 283 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात एकूण 50.40 टक्के मतदान झाले. या निवडणुकीसाठी 16 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

सोमवारी झालेल्या मतदानात विभागातील नाशिक जिल्ह्यात 69 हजार 652 मतदारांपैंकी 31 हजार 933 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून नाशिक जिल्ह्यात 45.85 टक्के मतदान झाले आहे. नगर जिल्ह्यात 1 लाख 15 हजार 638 मतदारापैंकी 58 हजार 283 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जिल्ह्यात 50.40 टक्के मतदान झाले आहे.

धुळे जिल्ह्यात 23 हजार 412 मतदारापैंकी 11 हजार 822 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 50.50 टक्के मतदान झाले आहे. जळगावमध्ये 35 हजार 58 मतदारापैंकी 18 हजार 33 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जिल्ह्यात 51.44 टक्के मतदान झाले आहे. नंदूरबार जिल्ह्यात 18 हजार 918 मतदारापैंकी 9 हजार 385 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 49.61 टक्के इतके मतदान नंदूरबार जिल्ह्यात झाले आहे.

सोमवारी नगर जिल्ह्यात मतदानासाठी राजकीय नेत्यांची धावपळ होती. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी येथे मतदान केले. संगमनेर तालुक्यात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, उमेदवार सत्यजीत तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी कुटुंबीयासह मतदानाचा हक्क बजावला. ज्येष्ठ नेते, माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी सोनई येथील केंद्रावर मतदान केले. माजी मंत्री, आमदार शंकरराव गडाख यांनी पत्नी सुनिता गडाख यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. आ. संग्राम जगताप यांनी नगरमधील रेसिडेन्सिअल केंद्रावर मतदान केले.

जिल्ह्यात 79 हजार 923 पुरूष मतदार, तर 35 हजार 715 महिला मतदार होत्या. मतदानासाठी प्रत्येक महसूल मंडळावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच शहरी भागात जास्त मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यात 147 केंद्रांवर मतदान झाले. सरासरी एक ते दीड हजार मतदारांसाठी एक मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. या निवडणूक प्रक्रियेसाठी एक हजार 500 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. बॅलेट पेपरचा वापर करण्यात आला.

निवडणुकीची मतदान प्रक्रिया अचूक व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कर्मचार्‍यांना दोन टप्प्यात प्रशिक्षण दिले होते. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 29 हजार 115 मतदार होते. तेथे सर्वाधिक 28 केंद्रे होते. राहाता तालुक्यात 15 मतदान केंद्र होते. जामखेड तालुक्यात सर्वाधिक कमी म्हणजे पाच मतदान केंद्र होते. सकाळी आठ ते दुपारी दोनपर्यंत 37 हजार 641 मतदारांनी म्हणजेच 32.55 टक्के मतदारांनी मतदान केले होते.

जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर बुथची उभारणी केली होती. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात 79 हजार 923 पुरुष तर 35 हजार 715 महिला असे एकूण 1 लाख 15 हजार 638 मतदार होते. त्यापैकी 43 हजार 206 पुरुष तर 15 हजार 77 महिला अशा प्रकारे 58 हजार 283 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

तालुकानिहाय मतदान: 

अकोले 4 हजार 41 (49.82), संगमनेर 17 हजार 95 (58.72), राहाता 6 हजार 339 (41.55), कोपरगाव 2 हजार 348 (39.56), श्रीरामपूर 3 हजार 609 (44.39), राहुरी 3 हजार 610 (46.46), नेवासा 3 हजार 828 (55.60), नगर 5 हजार 122 (49.33), पाथर्डी 2 हजार 62 (48.16), शेवगाव 1 हजार 729 (41.73), पारनेर 1 हजार 908 (50.74), श्रीगोंदा 2 हजार 527 (57.63) आणि कर्जत 1 हजार 749 (60.39) असे आहे.

Web Title: 49.28 percent total voter turnout for Nashik graduate Constituency election

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here