Home क्राईम नात्याला काळीमा! मामाकडून 4 वर्षीय भाच्याची हत्या

नात्याला काळीमा! मामाकडून 4 वर्षीय भाच्याची हत्या

Dhule Crime News: एका व्यक्तीने त्याच्या ४ वर्षीय भाच्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

4-year-old nephew killed by maternal uncle

धुळे: धुळ्यात एका व्यक्तीने त्याच्या ४ वर्षीय भाच्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. कारण अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेने मात्र एकच खळबळ उडाली आहे.  

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चिमुकला घराबाहेर अंगणात खेळत होता. मात्र, काही वेळेनंतर घरातील सदस्यांना दिसलाच नाही. त्यामुळे घरातील सदस्यांनी त्याची शोधाशोध सुरु केली. त्यावेळी चिमुकला बाहेर कुठेही सापडला नाही. त्यामुळे घरातील लोकांनी शेजारीच असलेल्या बाथरूममध्ये पाहणी केली असता त्यावेळी या चिमुकल्याच्या मामा त्याला पाण्याच्या टाकीत बुडवून शेजारी बसल्याचा आढळून आला. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने चिमुकल्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र,  उपचार सुरु असताना डॉक्टरांनी चिमुकल्यास मृत घोषित केले.

मामानेच अशा प्रकारचे कृत्य का केले, याबाबत सध्या परिसरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं आहे. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित मामाच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या मामाने अशा प्रकारचे कृत्य का केले, याचा अधिक तपास चाळीसगाव रोड पोलीस करीत आहेत.

Web Title: 4-year-old nephew killed by maternal uncle

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here