संगमनेर: या बँकेत 4 कोटी 20 लाख रूपयांचा बनावट सोने तारण घोटाळा, गोल्ड व्हॅल्युअर सामील, 136 जणांवर गुन्हे
बँकेचे माजी व्यावस्थापक, व्हॅल्युअर आणि कर्जदार यांनी मिळून 4 कोटी 20 लाख 15 हजार 807 रुपयांचा अपहार(Scam) .
संगमनेर: शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नासिक मर्चंट को-ऑपरेटीव्ह बँक शाखा संगमनेर येथील 4 कोटी 20 लाख रूपयांचा बनावट सोने तारण घोटाळा उघड झाला आहे. यापूर्वीच्या घटनेतील आरोपींना लगेच जामीन मिळाला होता. त्याच घटनेतील गोल्ड व्हॅल्युअर जगदीश शहाणे हा या घोटाळ्यात ही सामील आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की, संगमनेर शहरात गायत्री सोसायटी येथे असणाऱ्या दि नासिक मर्चंट को-ऑपरेटीव्ह बँक लि. बँकेत फार मोठा सोने तारण घोटाळा झाल्याचे उघैडकीस आले आहे. यात बँकेचे माजी व्यावस्थापक, व्हॅल्युअर आणि कर्जदार यांनी मिळून 4 कोटी 20 लाख 15 हजार 807 रुपयांचा अपहार केला आहे. हा प्रकार गेल्या दोन वर्षात घडला असून एक ना दोन तब्बल एकुण 136 खातेदारांनी बनावट सोने ठेवून कर्ज काढले आहेत. तर, आता यापैकी 12 जणांनी त्यांचे खाते बंद केले असून तरीही 136 जण अद्याप आरोपाच्या पिंजऱ्यात उभे आहेत. त्यामुळे बँकेच्या माजी अधिकाऱ्यांसह एकूण 136 जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अकोले, संगमनेर, नाशिक, पुणे अशा ठिकाणच्या व्यक्तींचा सामावेश असून या खळबळजनक माहीतीमुळे बँकींग क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे याबाबत बँकेचे विद्यमान व्यवस्थापक निलेश वसंत नाळेगांवकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. की, दि. 1 नोव्हेंबर 2021 ते 2 फेब्रुवारी 2023 पर्यंत योगेश बाळासाहेब पवार हे संगमनेर शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणुन काम पहात होते
त्यांच्या काळात या शाखेमार्फत सोने तारण कर्ज दिले जात होते. हे कर्ज ग्राहकांचे सोने बँकेत गहाण (तारण) ठेऊन दिले जाते. सदर सोने गहाण ठेवतांना अधिकृत व्हॅल्युअर मार्फत सोन्याचे बँक व्हॅल्युएशन करून घेतले जाते तसा मुल्यांकनाचा शेरा व दाखला घेऊन बँक व्हॅल्युअरने दिलेल्या सोन्याच्या मुल्यांकनाचे आधारे कर्ज दिले जाते अशा प्रकारे सोन्याचे दागिन्यांचे मुल्यांकन करण्यासाठी बँकेने जगदिश लक्ष्मण शहाणे याला अधिकृत व्हॅल्युअर म्हणून दि. 19 डिसेंबर 2014 रोजी नियुक्त केलेले होते. त्याने केलेल्या मुल्यांकनांच्या आधारे बँकेने विविध ग्राहकांना कर्ज दिलेले आहेत तरी, संगमनेर शहरात महाराष्ट्र ग्रामीण बँक, संगमनेर येथे काही सोने तारण कर्ज यात काही सोने खोटे निघाल्याचे अधिकाऱ्यांना समजले होते.
त्यामुळे त्याची चौकशी करण्याचे ठरविले होते. त्यानुसार बँकेने सर्व ग्राहकांना बँकेत सोने तपासणी करणेकामी उपस्थित राहणे बाबत लिखित स्वरूपात नोटीसा जाहिर केल्या होत्या त्यानंतर बँकेने कर्जदारांच्या उपस्थितीत सोन्याची तपासणी केली तसेच लेखी पत्र देऊनही जे ग्राहक सोने तपासणी कामी उपस्थित झाले नाहीत त्यांचे बाबत योग्य ती दक्षता घेऊन व्हीडीओ शुटींगमध्ये सोन्याची तपासणी बँकेचे दुसरे पॅनल व्हॅल्युअर यांचे मार्फत करण्यात आली. तेव्हा लक्षात आले की, कर्जापोटी ठेवलेले दागिने हे सोने नसुन ते खोटे असल्याचे निदर्शनास आले.
एकंदरीत या फसवणुकीमध्ये बँकेचे व्हॅल्युअर जगदिश शहाणे व कर्जदार यांनी संगनमताने खोटे दागिने ठेऊन, विश्वासघात करून, बँकेची फसवणुक केली. यात एकूण 136 खातेदार आहेत त्यापैकी 12 खातेदारांनी त्यांचे कर्ज खाते बंद केलेले असून एकूण 124 खातेदार शिल्लक आहेत. यांच्याकडून 4 कोटी 20 लाख 15 हजार 807 रुपये येणे आहे. त्यामुळे बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी योगेश बाळासाहेव पवार यांचे कार्यकाळात सदर प्रकार घडला असल्याने त्यांच्यासह 153 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे बँकींग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून कोट्यवधींचे घोटाळे उघड होत आहे यामुळे सोने गहाण ठेवणारे यांच्यातही चिंतेचे वातावरण आहे.
Web Title: 4 Crore 20 Lakh Fake Gold Pledge Scam, Gold Valuer Involved
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App