Home नाशिक विद्यार्थिनीच्या छातीवर हात फिरवला अन्… प्राध्यापकाने ओलांडल्या नैतिकतेच्या सीमा

विद्यार्थिनीच्या छातीवर हात फिरवला अन्… प्राध्यापकाने ओलांडल्या नैतिकतेच्या सीमा

Breaking News | Nashik Crime: एका नामांकित नर्सिंग कॉलेजमधील प्राचार्याविरोधात कॉलेजमधील 4 विद्यार्थिनींने विनयभंगाचा गंभीर आरोप केला.

4 college students make serious allegations of molestation 

Nashik Crime News: शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा नात्याला काळिमा फसणारी धक्कादायक घटना नाशिकमधून समोर आली आहे. नाशिक शहरातील एका नामांकित नर्सिंग कॉलेजमधील प्राचार्याविरोधात कॉलेजमधील 4 विद्यार्थिनींने विनयभंगाचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकणी भद्रकाली पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रवीण रमेश घोलप असे संशयित प्राचार्याचं आहे. पोलिसांनी प्रवीण रमेश घोलपला अटक केली आहे. नाशिकमध्ये एका खाजगी नर्सिंग कॉलेजमध्ये पीडिता मागील 9 महिन्यांपासून शिक्षण घेत आहे. 5 ऑगस्ट 2024 पासून 29 मे 2025 पर्यंत द्वारका सर्कल येथील एका नर्सिंग कॉलेजमध्ये ही पडिता शिकत आहे. या काळात प्राचार्य प्रवीण घोलपने वारंवार पीडितेस त्रास देत शारीरिक संबंधांची मागणी केली. तिच्या खांद्यावर, छातीवर आणि पाठीवर हात फिरवला, तसेच हात हातात घेऊन अश्लील स्पर्श केला, असं तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

प्राचार्य प्रवीण घोलपने पीडितेची साडी ओढण्याचा प्रयत्न करत अश्लील नजरेने पाहून तिचा विनयभंग केला. असा आरोप पीडितेने केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. पीडितेने लेखी तक्रार दाखल केल्यानंतर एफआयआर नोंदवून पोलिसांनी पुढील कारवाई केली आहे.

घटना घडली त्यावेळेस पीडिता अतिशय घाबरलेली होती. तिच्या अन्य मैत्रीणींबरोबरही असाच प्रकार घडला असल्याची माहिती तिला समजतात तिने भद्रकाली पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी चार वेगवेगळे गुन्हे दाखल करून 40 वर्षीय संशयित प्रवीण घोलपला अटक केली. गुन्ह्यांचा अधिक तपास सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव करत आहेत.

Breaking News: 4 college students make serious allegations of molestation 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here