35 वर्षीय महिला, 29 वर्षीय तरुण, प्रेमप्रकरण, पैसा आणि लग्नाचा तगादा, महिलेची हत्या
Thane Murder Case: महिलेची हत्या ही प्रेम प्रकरणातून झाल्याचं समोर आलं. हात उसने दिलेले पैसे दे नाहीतर लग्न कर असा तगादा. तरुणाने संपविले.
ठाणे : अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या ब्रीजवर झालेली महिलेची हत्या ही प्रेम प्रकरणातून झाल्याचं समोर आलं आहे. मयत महिलेने आरोपीला उसने पैसे दिले होते. ते पैसे परत कर नाहीतर लग्न कर असा तगादा तिने लावल्यानंतर आरोपीने तिची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मयत सीमा कांबळे आणि आरोपी राहुल भिंगारकर यांचे प्रेमसंबंध होते. सीमा कांबळे ही 35 वर्षांची होती तर राहुल भिंगारकर हा 29 वर्षांचा आहे. सीमाने राहुल भिंगारकरला हात उसने पैसे दिल्याची माहिती आहे. त्यानंतर सीमाने पैशासाठी तगादा लावला होता. हात उसने दिलेले पैसे दे नाहीतर लग्न कर असा तगादा सीमा कांबळने आरोपी राहुल भिंगारकर मागे लावल्याची प्राथमिक माहिती आहे.
सीमा कांबळे ही विवाहित असून ती पतीपासून विभक्त राहत असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. सीमा आणि राहुल एकाच परिसरात राहत असून यांचे प्रेम संबंध जुळले. नंतर त्यांच्यामध्ये आर्थिक व्यवहारही झाल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली.
अंबरनाथमधील बारकूपाडा परिसरात राहणाऱ्या सीमा कांबळे या महिलेवर तिचा प्रियकर, राहुल भिंगारकर याने भरदिवसा धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या केली आहे.
पैसे तरी दे नाहीतर लग्न तरी कर अशी मागणी सीमा राहुलकडे करायची. सोमवारी अंबरनाथ रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या ब्रीजवर या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपी राहुलने सीमावर धारधार शस्त्राने हल्ला केला आणि तिची हत्या केली.
Web Title: 35-year-old woman, 29-year-old man, love affair, money and marriage
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News