संगमनेर: तरुणाची ३३ हजारांची ऑनलाईन फसवणूक
Sangamner Crime: तरुणाच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यावरून ३२ हजार ८९७ रुपयांना ऑनलाईन गंडा घातला असल्याचा धक्कादायक प्रकार.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापूर येथील रहिवासी असणाऱ्या किरण दगडू सोनवणे या तरुणाच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यावरून ३२ हजार ८९७ रुपयांना ऑनलाईन गंडा घातला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापूर येथील किरण दगडू सोनवणे यांचे संगमनेर मधील बँक ऑफ बडोदा मध्ये २०११ पासून खाते आहे. या खात्यावर त्यांचे शेतीचे पैसे येत असतात. २३ सप्टेंबरला त्यांच्या बँक खात्यातून ३२ हजार ८९७ रुपये दुसऱ्याच्या यूपीआय नंबरवरती ट्रान्सफर केल्याचे खात्यावर ७० पैसे एवढी रक्कम शिल्लक राहिली.
त्यामुळे त्यांनी बँकेत जाऊन संबंधित व्यवहाराचे स्टेटमेंट काढले असता त्यांना २४ ऑक्टोबरला सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास एका खात्यावर यूपीआय नंबरने हे रक्कम ट्रान्सफर झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सोनवणे यांना जबरदस्त धक्काच बसला.
सोनवणे यांनी बडोदा बँकेच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता आपली कुणीतरी अज्ञात इसमाने ऑनलाईन फसवणूक केली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी थेट संगमनेर तालुका पोलिस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Web Title: 33 thousand online fraud of young man
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App