मराठा आरक्षणासाठी ३० वर्षीय तरुणाची तलावात उडी घेऊन आत्महत्या
मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) मिळावं यासाठी एका ३० वर्षीय तरुणाने तलावात उडी घेत आत्महत्या (Suicide) केल्याचे समोर आले.
Maratha Reservation: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेट घेण्याची शक्यता आहे. जालन्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरु आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. इतकेच नाही तर सरकारही त्यांच्या मागण्यापुढे झुकताना दिसत आहे. अशातच धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी एका ३० वर्षीय तरुणाने तलावात उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
किसन चंद्रकांत माने, असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. किसन माने हा उमरगा तालुक्यातील माडज येथील रहिवाशी होता. मराठा समाजाला आरक्षण मिळाणं गरजेचं आहे, असं म्हणत किसनने तलावात उडी घेतली. या घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास करत आहेत.
जालन्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर जालन्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकारचं लक्ष गेलं. आरक्षणासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलेत. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ मंगेश सांबळे या सरपंचाने स्वत:ची कारच पेटवली होती. मराठा आरक्षण मिळण्यासाठी विविध ठिकाणी शहरे बंद ठेवण्यात आली आहे.
Web Title: 30-year-old youth commits suicide by jumping into lake for Maratha reservation
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App