अहिल्यानगर: साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन १३ वर्षीय शाळकरी मुलीची आत्महत्या
Ahilyanagar Suicide: राहत्या घरात सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन १३ वर्षाच्या शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची घटना.
अहिल्यानगर : राहत्या घरात सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन १३ वर्षाच्या शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची घटना नवनागापूर येथील साईनगर, मनोरमा कॉलनीत १६ जानेवारीला घडली. दिव्या सत्येंद्र शहा (वय १३, रा. साईनगर, मनोरमा कॉलनी, नवनागापूर) असे मयत मुलीचे नाव आहे.
दिव्या हिने घरात सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यावर तिच्या वडिलांनी तिला बेशुद्धावस्थेत उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले.
तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. ढगे यांनी तिची तपासणी केली असता ती उपचारापूर्वीच मयत झाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी तशी माहिती पोलीस अंमलदार गोसावी यांना दिली.
अंमलदार गोसावी यांनी दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार अडबल हे अधिक तपास करत आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.
Web Title: 3-year-old school girl committed suicide by hanging herself
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News