Home Accident News अहमदनगर: पिकअपला खासगी बसने दिली धडक अपघतात ३ ठार, 12 जखमी

अहमदनगर: पिकअपला खासगी बसने दिली धडक अपघतात ३ ठार, 12 जखमी

Ahmednagar News:  पुण्याहून नगरच्या दिशेने येताना थांबलेल्या पिक अपला खासगी बसला जोराची धडक दिल्याने अपघात (Accident). या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

3 killed, 12 injured in a private bus collision with a pickup truck

अहमदनगर:  नगर तालुक्यातील चास शिवारात पुण्याहून नगरच्या दिशेने येताना थांबलेल्या पिकअपला खासगी बसने मागून जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या  अपघातात दोन पुरुष व एक महिला मृत  झाली आहे. तर, अन्य बारा जण जखमी झाले आहेत. शनिवारी पहाटे 4.40 वाजता ही दुर्दैवी घटना घडली.

मृत व जखमी हे बीड व धाराशिव जिल्ह्यातील आहेत. दिवाळीच्या निमित्ताने नगरमार्गे ते पुण्याहून बीडला गावाकडे जात असताना चास शिवारात एका पेट्रोल पंपासमोर एक कार रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला जाण्यासाठी थांबली. त्यामागे पिकअपही (एमएच 12, एलटी 3913) येऊन थांबली. त्यानंतर काही सेकंदात मागून आलेल्या खासगी बसने (एमएच 43 बीपी 8435) पिकअपला धडक दिली. यात पिकअपमधील तिघांचा मृत्यू  झाला. तर बारा जण जखमी झाले. तसेच, बस चालकही झाला आहे. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी दाखल केले. पिकअप पुढे उभ्या असलेल्या कारचेही अपघातात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक युवराज चव्हाण पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

या अपघातात सारिका कागदे, प्रविण कागदे (वय 26, दोघे रा. मोरगाव, जि. बीड), दीपक चव्हाण (रा. पखरूड, ता. भूम) हे मृत झाले आहेत. तर सुरज कागदे (वय 18), बजरंग कागदे (चालक), धीरज कागडे (वय 17), मच्छिंद्र कागदे, राहुल कागदे (वय 23), सीता कागदे, आरुषी कागदे (वय 9), आरती कागदे (वय 21), आरती कागदे (वय 15), श्रुती कागदे (वय 14, सर्व रा. मोरगाव, जि. बीड), धीरज जोगदंड (रा. पिंपळगाव, ता.वाशी, जि. धाराशिव) हे जखमी झाले आहेत.

Web Title: 3 killed, 12 injured in a private bus collision with a pickup truck

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here