कॉलेज तरुणी घरात कोणी नसताना नको ते करून बसली अन…
Jalgaon: १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना, उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू.
जळगाव : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना या विद्यार्थिनीचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला आहे. पल्लवी सुरेंद्र भालेराव (वय-१७, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पल्लवी हिच्या आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीत पल्लवी भालेराव ही आई, वडील आणि मोठ्या भावासह राहत होती. नुकताच तिने बारावी कॉमर्समध्ये सिद्धिविनायक महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून पल्लवी ही कोणत्यातरी कारणावरुन तणावात होती. या तणावातून सोमवारी पल्लवीने घरात कुणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. नातेवाईक व शेजारच्यांनी तातडीने धाव घेत तिला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते, मात्र पाच दिवसांपासून पल्लवी हिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.
शनिवारी पल्लवीची प्रकृती अधिक खालावल्याने तिला खासगी रूग्णालयातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याचदरम्यान उपचार सुरू असताना पल्लवीची प्राणज्योत मालवली. पल्लवीच्या आई, वडिलांसह कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला.
Web Title: 12th-grade student committed suicide by hanging herself in her house
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App