पुराच्या पाण्यात २९ वर्षीय युवक गेला वाहून; आईने फोडला टाहो
Breaking News | Nashik Rain: नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागांत मुसळधार पाऊस.
नाशिक: गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागांत मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहतांना पाहायला मिळत आहे. तर नाशिक शहरात देखील जोरदार पाऊस कोसळत असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे गोदाघाटावर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक छोटी-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. त्यातच आता रामकुंड परिसरातून पुराच्या पाण्यातून एक २९ वर्षीय पर्यटक युवक व तीन वर्षीय मुलगी वाहून गेल्याची घटना घडली आहे. यातील मुलीला वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, यग्नेश पवार (वय २९, रा.ओझर) असे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. तो महावितरणमध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत असून भुसावळ येथे नेमणूक होती. तो नीलकंठेश्वर मंदिर येथे काल सर्प योग पूजेनिमित्त आला होता. यावेळी गोदावरी नदीत) पूजन करताना पाय घसरून नदीत पडल्याने तो वाहून गेला. यावेळी त्याची आई देखील त्याठिकाणी उपस्थित होती. यावेळी डोळ्यादेखतच आपला तरणाबांड मुलगा वाहून गेल्याने तिने एकच टाहो फोडला होता. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून सदर युवकाचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध मोहीम राबवली जात आहे.
दरम्यान, गंगापूर धरणातून आज दुपारी १२ वाजता एकूण ५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यानंतर दुपारी ३ वाजता एकूण १ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
Web Title: 29-year-old youth was swept away in the flood waters
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study