भर दिवसा बसस्थानक परिसरात 26 वर्षीय तरुणाला गावठी कट्ट्याचे 12 राऊंड फायर करत संपवले..

    Breaking News | Jalgaon crime : परिसरात भर दिवसा मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी 26 वर्षीय तरुणावर गावठी कट्ट्याने  तब्बल 12 राउंड फायर करत संपवल्याची धक्कादायक घटना. (Firing)

    26-year-old youth was killed by firing 12 rounds of a village gun 

    जळगावच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात भर दिवसा मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी 26 वर्षीय तरुणावर गावठी कट्ट्याने  तब्बल 12 राउंड फायर करत संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे .  वाळूमाफिया आणि स्थानिक गटातील संघर्षातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे .या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून मृत तरुणाच्या शरीरावर झाडलेल्या गोळ्यांमुळे त्याच्या शरीराची चाळण झाली होती .आकाश कैलास मोरे असे मृत तरुणाचे नाव आहे . या घटनेचा अधिक तपास सुरू आहे .

    प्राथमिक माहितीनुसार, आकाशचा संबंध वाळू उत्खनन आणि वाहतूक व्यवसायाशी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आकाश बसस्थानक परिसरात उभा असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर गावठी कट्ट्यातून 12 राऊंड फायर केले. गोळ्यांच्या माऱ्यामुळे तरुण जागीच कोसळला.

    आकाशच्या शरीरावर तब्बल 12 गोळ्या लागल्याची माहिती असून, त्याच्या मृतदेहाची स्थिती अत्यंत भीषण होती. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि स्थानिकांकडून माहिती घेऊन आरोपींचा शोध सुरू आहे.

    दोन दिवसांपूर्वी आरोपीचे स्टेटस

    विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी आकाशने आपल्या सोशल मीडियावर एक स्टेटस व्हिडीओ पोस्ट केला होता. “शेठ, तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही थेट छातीवर मारतो…” अशा भाषेत केलेल्या स्टेटसनंतरच त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्यामुळे ही हत्या वैयक्तिक वैरातून झाली की वाळू व्यवसायातील वर्चस्व दाखवण्यासाठी  घडवली गेली, याचा अधिक तपास पोलीस करीत आहे.

    Breaking News: 26-year-old youth was killed by firing 12 rounds of a village gun 

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here