Home नाशिक धक्कादायक! २० वर्षीय विवाहितेला शेतावर नेऊन सामुहिक अत्याचार

धक्कादायक! २० वर्षीय विवाहितेला शेतावर नेऊन सामुहिक अत्याचार

Nashik Crime News: पंचवटी परिसरात एका वीस वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना.

20-year-old married woman was taken to a farm and gang-raped

नाशिक:  नाशिकमधून धक्कादायक घटनाउघडकीस आली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात एका वीस वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेवर अत्याचार करणारा आरोपी तिचा नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित महिलेचा पती तुरुंगात शिक्षा भोगत आहे. आरोपींनी तिच्या पतीला जामीन देऊन सोडवण्याचे आमिष दाखवले. पीडितेला शेतावर नेले आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. आरोपींनी मिळून तिला मारहाण देखील केली. त्यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात अत्याचार आणि मारहाण झाल्याची तक्रार केली. अत्याचार करणारी व्यक्ती ही पीडित महिलेचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. त्या आरोपीनेच पीडितेला आमिष दाखवत शेतामध्ये नेले होते. दरम्यान या प्रकाराची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर फरार असलेल्या एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: 20-year-old married woman was taken to a farm and gang-raped

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here