Home जळगाव चिमुकला खेळण्यासाठी बाहेर पडला अन तो पुन्हा घरी परतलाच नाही

चिमुकला खेळण्यासाठी बाहेर पडला अन तो पुन्हा घरी परतलाच नाही

Jalgaon: गिरणा नदी पात्रात पाय घसरून पडल्याने सहावीत शिकत असलेल्या १२ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना.

A 2-year-old boy studying in class six died after his feet slipped in the river bed

जळगाव: आव्हाणे येथील गिरणा नदी पात्रात पाय घसरून पडल्याने सहावीत शिकत असलेल्या १२ वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैभव नरेंद्र पाटील (वय १२) असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वैभव हा खेळण्यासाठी बाहेर पडला होता. त्यानंतर तो पुन्हा घरी परतला नाही. अखेर दुसऱ्या दिवशी त्याचा शोध सुरू असताना थेट नदीपात्रात मृतदेह आढळला असल्याची माहिती मिळाली आहे. जळगाव तालुक्यातील आव्हाने गावात वैभव पाटील हा आपल्या आईवडील आणि लहान भाऊ यांच्यासह वास्तव्याला होता. वैभव हा सहावीच्या वर्गात शिकत होता. मंगळवारी दुपारी ३ वाजता घरातून निघाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत वैभव घरी न आल्यामुळे नातेवाईकांनी वैभवचा शोध घेतला. गावात आणि शेतीशिवारात शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही.  

याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. बेपत्ता झालेल्या वैभवला गावातील काही जणांनी मंगळवारी दुपारच्या वेळेस गिरणा काठावरील महादेव मंदिरात खेळताना पाहिले. याठिकाणी वैभवचे काका धीरज पाटील यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर खेळता खेळता वैभव नदीवर गेला असावा या शंकेने बुधवारी दुपारी धीरज पाटील व स्वप्नील जोशी यांच्यासह काही जण नदी पात्रात शोध घेत असताना, गिरणेच्या वरच्या भागातील पात्रात वैभवचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

मृत्यूची बातमी मिळाल्यावर आई वडील आणि त्याच्या कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. तालुका पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: A 2-year-old boy studying in class six died after his feet slipped in the river bed

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here