Home संगमनेर संगमनेर: स्कुटीच्या डिकीतून २ लाख रुपये केले लंपास !

संगमनेर: स्कुटीच्या डिकीतून २ लाख रुपये केले लंपास !

Breaking News | Sangamner Crime: इलेक्ट्रिक स्कुटीच्या डिकीत ठेवलेली दोन लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना.

2 lakh rupees were made from the scooty's dick

संगमनेर: इलेक्ट्रिक स्कुटीच्या डिकीत ठेवलेली दोन लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना एचडीएफसी बँकेजवळील लिंक रोडवर भर दुपारी घडली.

याबाबत शहर पोलिसांनी सांगितले की, शहरातील नवघर गल्लीजवळील लिंक रोडवर सोमवारी एचडीएफसी बँकेसमोर उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक स्कुटीच्या डिक्कीमध्ये दोन लाख रूपयांची रोकड होती. भर दुपारी दीड वाजेच्या सुमारास चोरट्यांनी पाळत ठेवून डिक्कीतून रोकड घेवून पोबारा केला. आकाश कैलास जेधे (३३, रा. जेधे कॉलनी, संगमनेर) यांची ही रक्कम होती. जेधे यांनी डिकी उघडली असता दोन लाखाची रक्कम चोरीस गेल्याचे त्यांना समजले. जेधे यांनी मंगळवारी शहर पोलिसात याप्रकरणी फिर्याद दाखल केली. चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार जाधव करीत आहे. संगमनेरात गुन्हेगारांचा सुळसुळाट !

संगमनेरात चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. गुन्हेगारांचा सुळसुळाट वाढला आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर रविंद्र देशमुख यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जुगार, मटका व अवैध कत्तलखाने ही संगमनेर शहराची ओळख होत आहे तर दुसरीकडे भर दिवसा गुन्हेगारी वाढत आहे.

Web Title: 2 lakh rupees were made from the scooty’s dick

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here