Home ठाणे बाल आश्रमात २ मुलींवर अत्याचार, पाच जणांवर गुन्हा

बाल आश्रमात २ मुलींवर अत्याचार, पाच जणांवर गुन्हा

Breaking News | Thane Crime: अनधिकृत बाल आश्रमात २९ बालकांना जबर मारहाण तसेच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होत असल्याची तक्रार.

2 girls raped in children's shelter, five people charged with crime

ठाणे: जिल्हह्यातील खडकली येथील अनधिकृत बाल आश्रमातील अन्याय पीडित २९ मुलांची जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने मंगळवारी सुटका केली. यामध्ये २० मूली आणि नऊ मुलांचा समावेश आहे. त्यांना उल्हासनगर येथील मुलींचे विशेषगृह व बालगृह तसेच कनिष्ठ व वरिष्ठ मुलांचे शासकीय बालगृहात सुरक्षित ठेवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोन्हे यांनी बुधवारी मुलांची भेट घेऊन विचारपूस केली.

ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे पसायदान विकास संस्था’ या नावाने चालविल्या जाणाऱ्या अनधिकृत बाल आश्रमात २९ बालकांना जबर मारहाण तसेच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होत असल्याची तक्कार चाइल्ड हेल्पलाइनवर प्राप्त झाली होती. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने या मुलांची मंगळवारी सुटका करून, मुलांना उल्हासनगर येथील शासकीय बालगृहात सुरक्षितपणे दाखल केले

संस्थेचे संचालक बबन नारायण शिंदे, त्यांची पत्नी आशा बबन शिंदे, संचालक मुलगा प्रसन्न बबन शिंदे, त्यांना मदत करणारे प्रकाश सुरेश गुप्ता व दर्शना लक्ष्मण पंडित या पाच जणांविरुद्ध बाल न्याय अधिनियम २०१५ आणि बालकाचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. सर्व आरोपी खडवली येथील आहेत.

Breaking News: 2 girls raped in children’s shelter, five people charged with crime

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here