बहिणीकडे कार्यक्रमासाठी आलेल्या युवकासोबत घडली धक्कादायक घटना, दुर्दैवी मृत्यू
Ahmednagar News: बहिणीकडे कार्यक्रमासाठी आलेल्या १८ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना.
शेवगाव : तालुक्यातील कन्हेटाकळी येथे बहिणीकडे कार्यक्रमासाठी आलेल्या १८ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि.२७) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. वैभव गोरक्षनाथ वीर (रा. ताजनापूर) असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बहिणीकडे जागरण गोंधळाचा कार्यक्रम असल्याने तो युवक क-हेटाकळी येथे आला होता. यावेळी मंडपाच्या खांबात विजेचा प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत शेवगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: An 18-year-old youth who came to his sister for a program died due to an electric shock
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App