Home पुणे 18 वर्षीय तरुणीची भररस्त्यात हत्या, सपासप वार करून खून

18 वर्षीय तरुणीची भररस्त्यात हत्या, सपासप वार करून खून

Breaking News | Pune Crime : दोघा अज्ञात व्यक्तींनी रस्त्यातच सपासप वार करून खून केला.

18 year old Tarunichi murdered, murdered by stabbing her

पुणे: पिंपरी चिंचवड शहरातील वालेकरवाडी परिसरात रविवारी रात्री 18 वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोमल भरत जाधव (वय 18) असे मृत तरुणीचे नाव असून, तिच्यावर दोघा अज्ञात व्यक्तींनी रस्त्यातच सपासप वार करून खून केला आहे.

कोमल जाधव ही पिंपरी चिंचवड शहरालगत असलेल्या वाल्हेकरवाडीमधील कृष्णाईनगर परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहात होती. रविवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या दोघा युवकांनी तिच्यावर सपासप वार करत निर्घृण हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी सोबत सुरा आणि कोयत्यासारखी धारदार हत्यारे आणली होती, आणि त्याच्याच सहाय्याने त्यांनी हल्ला केला. या दोघा आरोपींची ओळख कोमलशी आधीपासूनच होती, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. विशेष म्हणजे, हे दोघेही मुळचे दिल्लीचे रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.

घटनेच्या वेळी मयत कोमल आपल्या घरात होती. यावेळी बाईकवरून आलेल्या दोन आरोपींनी तिला घराबाहेर बोलवून घेतलं. कोमल घराच्या खाली असता आरोपींनी तिच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. यानंतर शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कोमलची हत्या का करण्यात आली?  याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहे.

Breaking News: 18 year old Tarunichi murdered, murdered by stabbing her

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here