१८ वर्षीय तरुणीची राहत्या घरात आत्महत्या
श्रीरामपूर | Suicide: शहरातील संगमनेर रोडवरील गजानन कॉलनी येथे राहत असणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कल्याणी संतोष नाईक हिने राहत्या घरात अभ्यासाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
कल्याणी नाईक ही इयत्ता १२ वीत शिकत होती. अभ्यास करीत असताना तिने तिचे जीवन संपविले आहे. या आत्महत्या प्रकरणी शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस ठाण्यात नरहरी श्रीराम नाईक यानी आत्महत्याप्रकरणी फिर्याद नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय काळे हे करीत आहे.
Web Title: 18-year-old girl commits suicide at home