Home जालना तरुणाच्या जाचामुळे नैराश्यात गेलेल्या 17 वर्षीय मुलीने संपविले जीवन

तरुणाच्या जाचामुळे नैराश्यात गेलेल्या 17 वर्षीय मुलीने संपविले जीवन

Jalna Crime : छेडछाड करून ब्लॅकमेल करणाऱ्या एका तरुणाच्या जाचाला 11 वीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेत आत्महत्या.

17-year-old girl who was depressed due to a young man's torture Suicide

जालना: जालना जिल्ह्यातील अंबड येथे  छेडछाड करून ब्लॅकमेल करणाऱ्या एका तरुणाच्या जाचाला 11 वीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. तरुणाच्या सततच्या येणाऱ्या धमक्यांमुळे 17 वर्षीय मुलीने  गळफास लावून जीवनयात्रा संपवली आहे.  अंबड शहरातील शारदानगर भागात राहणाऱ्या या तरुणीला  आरोपींने वरती ओळख करून  मैत्रीच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग करून धमकावल्याने आज (दि.10) सकाळी या तरुणीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

अधिकची माहिती अशी की, अकारावीमध्ये शिकत असलेल्या मुलीची सातत्याने एका तरुणाकडून छेड काढण्यात येत होती. इन्स्टाग्रामवर मैत्री करुन त्यानंतर तरुणाने मुलीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. इतकचं नव्हे तर तरुणाकडून मुलीला धमक्याही देण्यात येत होत्या. जीवन संपलेल्या मुलीने  यापूर्वी आरोपी तरुणाविरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका सोहम मिंधर नावाच्या आरोपी तरुणास अटक देखील केलं आहे. या प्रकरणी इतर आरोपी असल्याचा संशय असून पोलीस याचा अधिक  तपास करत आहेत.

Web Title:17-year-old girl who was depressed due to a young man’s torture Suicide

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here