Home महाराष्ट्र फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका १६ वर्षीय मुलीवर अत्याचार

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका १६ वर्षीय मुलीवर अत्याचार

Crime news: फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका १६ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

16-year-old girl was assaulted by threatening to make the photo viral

वाळूज महानगर : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका १६ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोशनी (नाव बदलेले आहे) ही आई व भावासह बजाजनगर येथे वास्तव्यास आहे. शिक्षण सोडल्याने ती घरीच असते तर आई ही कंपनीत काम करते. तिच्या घराच्या शेजारी राहणारा मुलगा निशांत गायकवाड याच्याशी काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून बोलत असे. मात्र रोशनी ही अल्पवयीन मुलीवर अत्याचार माझे वय कमी असल्याने मी लग्न करू शकत नाही, असे त्यास सांगत होती.

दरम्यान, निशांतने रोशनीला बहेर गार्डनमध्ये इतरत्र फिरायला घेवून जात असे, त्यावेळी तिच्यासोबत त्याने मोबाइलमध्ये काही फोटी काढले होते, त्यानंतर तिला लग्न कर अन्यथा तुझ्या सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरवात केली. त्यानंतर निशांत हा २९ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घरासमोर भेटून रात्री १ वाजेच्या सुमारास माझ्या खोलीमध्ये आली नाही तर फोटो व्हायरल करण्याची पुन्हा धमकी दिली. त्यामुळे बदनामीच्या भितीने तिने ३० रोजी रात्री १ वाजेच्च्या सुमारास निशांत हा रोशनीच्या घरी आला व तिला निशांतच्या गच्चीवर घेवून गेला. त्यानंतर त्याने बळजबरीने तिच्च्त्यावर अत्याचार केला.

दरम्यान पहाटे ५ वाजेच्या सुमारास रोशनीची आई उठली असता त्यावेळी ती घरात दिसली नाही, म्हणून तिचा निशांतच्या गच्चीवर दिसली. त्यानंतर रोशनीला घेवून घरी जात असताना निशांतने तिच्या आईला माझ्या सोबत लग्न लावून द्या अन्यथा मी तिचे माझ्या सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या रोशनी व तिच्या आईने पोलीस ठाणे गाठत झालेला सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Web Title: 16-year-old girl was assaulted by threatening to make the photo viral

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here