Home पुणे 16 वर्षीय मुलगी आईस्क्रीम आणण्यासाठी गेली ती बेपत्ता

16 वर्षीय मुलगी आईस्क्रीम आणण्यासाठी गेली ती बेपत्ता

Breaking News | Pune Crime: १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना.

16-year-old girl goes missing after going to get ice cream

पुणे: कदमवाकवस्ती: १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) परिसरात शनिवारी (दि१९) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी सौरभ गायकवाड (रा. कदमवाकवस्ती ता हवेली जि. पुणे) याच्याविरुद्ध अपहरणाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ४० वर्षीय असून कदमवाकवस्ती परिसरात कुटुंबासोबत राहतात. फिर्यादी हे गाडी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. दरम्यान, शनिवारी सहा वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही आईस्क्रीम आणण्यासाठी गेली होती. आइस्किम आणण्याच्या बहाण्याने मुलीला आरोपी सौरभने कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले आहे,अशी फिर्याद अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे.

त्यानुसार आरोपी सौरभ गायकवाड याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विरोधात भारतीय न्याय संहीता कलम १३७ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करीत आहेत.

Web Title: 16-year-old girl goes missing after going to get ice cream

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here